कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक व भावफलक प्रदर्शीत करावे
साप्ताहिक सागर आदित्य
कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक व भावफलक प्रदर्शीत करावे
कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी भरारी पथक गठीत
वाशिम, जिल्हयात खरीप हंगामाची सुरुवात झालेली असुन बी - बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक इत्यादी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जून रोजी खरीप हंगाम २०२४ पुर्वनियोजन आढावा सभा संपन्न झाली. या आढावा सभेत बियाणे, खते व निविष्ठाचा पुरवठा, जादा दराने विक्री तसेच खते व बियाणे या निविष्ठांच्या लिंकींगबाबत कृषि विभागास सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात कृषी विभागाने परवानाधारक आतापर्यंत कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यात कार्यरत सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर कृषि केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या कृषि निविष्ठा बियाणे, खते, किटकनाशके यांचे अद्यावत साठा व भावफलक तसेच शेतक-यांच्या तक्रारीकरीता कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ हा व्हॉटस ऍप नंबर कृषि केंद्राबाहेर प्रदर्शीत करुन सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा.
तसेच सर्व शेतकरी बंधुनी कृषि निविष्ठांच्या संबधित काही तक्रारी असतील तर वरील टोल फ्री क्रमांकावर किंवा खाली दिलेल्या तक्रार निवारणासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक व जिल्हयात स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भरारी पथकातील सदस्यांच्या एस. टी. धनुडे जि.अ.कृ.अ.वाशिम
मो. ९३२५८००७५१, अरुण मुंदडा पंचायत समिती वाशिम ८६६८२०६७९४, संतोष गिरी पंचायत समिती मालेगाव ७९७२४३१५५१, सी. पी. भागडे जि. प. वाशिम ,८८०५८१०५१८, अरुण मुंदडा पंचायत समिती रिसोड ८६६८२०६७९४, संदीप सावळे पंचायत समिती मंगरूळपीर ७५८८५०२५९५, आकाश इंगोले जि.अ.कृ.अ. वाशिम, ९५७९७३८४५२, डी. एस. मकासरे पंचायत समिती मानोरा ९९२१४७३९५५, अनिल राठोड पंचायत समिती कारंजा ७५८८५०२५९५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम आरीफ शाह यांनी केले आहे.
0 Response to "कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक व भावफलक प्रदर्शीत करावे"
Post a Comment