
हृदयरोगाने ने ओलांडल्या वयाच्या सीमा ?
साप्ताहिक सागर आदित्य
हृदयरोगाने ने ओलांडल्या वयाच्या सीमा ?
XYZ वय 30 वर्षे पेशंट रात्रीपासून थोडा छातीत दुखत होत, आम्लपित्त चा त्रास असेल अस समजून रुग्णाने टाळाटाळ केली पण सकाळी खूपच जास्त छातीत दुखत होता, रुग्ण घामाने ओला झाला होता. दम लागत होता. मित्रांनी रुग्णास लगेचच काळूशे हॉस्पिटल,वाशीम येथे घेऊन आले.
Ecg केला असता त्यामधे extensive anterior wall MI ( STEMI ) होता म्हणजेच मोठा हार्ट अॅटॅक होता,
रुग्णाला तात्काळ रक्त पातळ करण्याच injection देण्यात आला. त्यानंतर रुग्ण स्थिर झाला.
त्यानंतर पुढे ईको व अँजिओग्राफी केली असता ह्या तपासण्या पूर्णपणे नॉर्मल होत्या म्हणजे अॅन्जिओप्लास्टी चि गरजच नाही.
एवढ्या कमी वयात हार्ट अॅटॅक ही गोष्ट आजच्या काळात नवीन नाही.
विशेषतः रुग्णाला कुठलही व्यसन नव्हत.
मग याची कारण काय?
1)वाढता तान ( stress)
2)Homocystein वाढणे- शाकाहारी व्यक्ति मध्ये
3)तसेच अचानक थंडी पडल्यामुळे हृदयाच्या नसा आकुंचित पावतात म्हणुन रक्तदाब वाढतो व हार्ट अॅटॅक येण्याच प्रमाण वाढते.
हृदयरोगाचि प्रामुख्याने पुढील कारणे आहेत.
1) मधुमेह
2) उच्च रक्तदाब
3) dyslipidemia ( चरबी वाढणे)
4) बैठी जीवनशैली
5) तंबाखू सेवन व धूम्रपान
6) दारूचे अति जास्त सेवन
7) वाढता तान
9) लठ्ठपणा
10) आनुवंशिकता
11) वाढते वय
12) Homocystein वाढणे
हृदय रोगाचे प्रामुख्याने प्रकार
हार्ट अॅटॅक- हृदयाच्या मास पेशी ला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होतो.
हार्ट फेलूअर - हृदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता कमी होणे.
हार्ट ब्लॉक- हृदयाच्या गतीचा कमी होण्याचा प्रकार
हृदयाची अनियंत्रित गती वाढणे .
हृदयामध्ये जन्मतःच छिद्र.
हृदयाच्या झडप ( valve) चे आजार
Cardiomyopathy
हृदयरोगाची लक्षणे
●छातीत दुखणे- छातीच्या मध्यभागी, डाव्या बाजूला दुखणे, ते गळ्यापर्यंत, पोटात किंवा डाव्या हातात जाऊ शकते.
● अचानक खूप जास्त घाम येणे
● घाबरून जाणे
●चक्कर येणे
●पायावर सुजन
●चालतांना, भारी काम, तसेच पायर्या चढतांना छातीत दुखणे किंवा श्वास फुलणे.
●हृदयाची धडकन जाणवने.
●भोवळ येणे
●हलका डोक दुखणे
वरील लक्षणे कमी जास्त प्रमाणात असू शकतात.
卐हार्ट अॅटॅक चि लक्षणे दिसू लागल्यास काय कराल
लगेचच रुग्णवाहिकेला फोन करून जवळच्या व्यक्ति सोबत हॉस्पिटल ला पोहोचा.
रुग्णांनी स्वतः गाडी किंवा चार चाकी चालवत येऊ नये . रुग्णाला आरामदायी स्थितीत ठेवावे.
शक्य असल्यास रुग्णाला loading डोस चावून देण्यात यावा यामधे
Tab aspirin 325 mg
Tab clopidogrel 300 mg
Tab atorvastatin 80 mg
हृदय रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक सल्ला
नियमितपणे रक्तातील शुगर तसेच रक्तदाब तपासा . ते अनियंत्रित असल्यास त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घ्या.
वर्षाला cholesterol चि तपासणी करा.
तणाव मुक्त जिवन जगा.
तंबाखू सेवन टाळा
दारू चे अति सेवन टाळा
नियमित व्यायाम करा
वजण नियंत्रित ठेवा
हृदय रोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्निग्ध पदार्थ टाळा ( चरबी युक्त)
तंतूमय पदार्थाचे सेवन जेवणात जास्त करा ( फायबर युक्त आहार)
पुरेशी झोप घ्या .
डॉ अतुल काळूशे
MBBS, MD Medicine
Fellowship in clinical cardiology
Ex senior Resident, cardiology
काळूशे हॉस्पिटल,वाशीम.
0 Response to "हृदयरोगाने ने ओलांडल्या वयाच्या सीमा ?"
Post a Comment