
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न।
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न। स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे दिनांक 2 फेब्रुवारी 24 ला दुपारी ठिक 3 वाजता शाळेच्या हॉल मध्ये माता पालक मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम आणि किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन कारयक्रमाचचे आयोजन केले असता शाळेच्या संचालिका सौ प्रमिलाताई भगत यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करणारत आली या वेळी आरोग्य विभागाचे डॉ साधना झळके यांनी मुलींना आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी, शारीरिक बदला विषयी माहिती विस्तृत पणे सांगीतली तर, आरोग्य सेविका सीमाताई कपाटे यांनी सुद्धा मुलींना मासिक पाळीच्या विषयी माहिती सांगितली तर अध्यक्षीय भाषणात बोलत असताना संचालिका सौ प्रमिलाताई भगत यांनी अशा कार्यक्रमाची आयोजन करणे काळाची गरज आहे असे सांगितले तर माता पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती साठी सजग असले पाहिजे असे सांगितले तर कारक्रमाचे प्रास्ताविक ज्योती इंगोले मॅडम यांनी, सूत्रसंचलन तेजस्वीनी इंगळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन विजयश्री सरनाईक मॅडम यांनी केले कारयक्रमाला शाळेच्या मुली व त्यांच्या माता बहुसंख्य प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका वैशाली चातुरकर मॅडम, सोळंके मॅडम, सविता भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले चहा पाणा नंतर कार्यक्रम सांगता करण्यात आले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न।"
Post a Comment