-->

मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड  लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा

मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा



 साप्ताहिक सागर आदित्य 

मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड

लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा


मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

 

वाशिम, केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभाग व मत्स्यव्यवसाय आयुक्त,मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हयात मच्छीमारांसाठी “घर-घर किसान क्रेडीट कार्ड” अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेच्या लाभासाठी जिल्हयातील सर्व मच्छीमार,खाजगी मत्स्यशेतकरी,मत्स्यव्यवसायाशी संबंधित इतर मत्स्यव्यवसायीक तसेच जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतील सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांनी केसीसी मिळण्यासाठी एक फोटो,आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्ससह सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,पद्मश्याम इमारत, सिव्हील लाईन,वाशिम येथे तात्काळ संपर्क साधावा.या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल यांनी केले आहे.    

  

                  

0 Response to "मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article