-->

मनरेगाअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना  लाभ घेण्यासाठी अर्ज करा

मनरेगाअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना लाभ घेण्यासाठी अर्ज करा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मनरेगाअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना

लाभ घेण्यासाठी अर्ज करा


       वाशिम,  :  जिल्हयातील शेतकऱ्यांकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना आता रेशीम संचालनालय, कृषी व पंचायत विभागाअंतर्गत राबविण्यात येणार आहे.


       लाभार्थ्यांनी योजनेत सहभाग घेण्यासाठीचा अर्जाचा नमुनासुध्दा जोडण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीननंतर लागवड करण्यासाठी अर्ज ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा रेशीम कार्यालय, उलेमाले बंगला, पुसद नाका, वाशिम येथे सादर करावे.


          महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड 682 मनुष्य दिवस,मजूरी दर 273 रुपये, अकुशलसाठी 1 लक्ष 86 हजार 186 रुपये तर कुशलसाठी 32 हजार रुपये असे एकूण 2 लक्ष 18 हजार 186 रुपये. किटक संगोपन गृह बांधकामसाठी मनुष्य दिवस 213, मजूरी दर 273 रुपये अकुशलसाठी 58 हजार 149 रुपये आणि कुशलसाठी 1 लक्ष 79 हजार 149 रुपये असे तीन वर्षासाठी 3 लक्ष 97 हजार 335 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये किटक संगोपन गृह बांधकाम 50X22 प्रमाणे 1100 वर्ग फुट बांधकाम तुतीच्या बागेजवळ करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अल्पभुधारक असावा, लाभार्थी मनरेगा जॉबकार्डधारक असावा. आधारकार्ड बँक खात्याला संलग्न केलेले असावे. बँक खाते पासबुक झेरॉक्स आणि सिंचनाची सोय असल्याचा दाखला किंवा सातबारावर विहीरीची नोंद असणे आवश्यक आहे.


          रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र - 2 ही योजनासुध्दा राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधकाम, किटक संगोपन साहित्य, तुती रोप वाटिका, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टीएंड रिलींग मशीनकरीता सर्वसाधारण वर्गासाठी 75 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येईल. असे रेशीम विकास अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे. 



0 Response to "मनरेगाअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना लाभ घेण्यासाठी अर्ज करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article