-->

शंकरराव गवळी विद्यालयाचे १९ खेळाडू जिल्हास्तरावर

शंकरराव गवळी विद्यालयाचे १९ खेळाडू जिल्हास्तरावर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शंकरराव गवळी विद्यालयाचे १९ खेळाडू जिल्हास्तरावर

   

     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि.०४ ऑक्टोबर व ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी मालेगाव तालुक्यातील  जिजामाता विद्यालय, पांगरी नवघरे येथे संपन्न झाल्या. यामध्ये अमानी येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयाच्या १९ खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.यामध्ये १४ वर्षे वयोगटात कु. भक्ती गवळी ६०० मी.धावणे- प्रथम,कु.सृष्टी खंडारे लांब उडी- द्वितीय, १९ वर्षे वयोगटात  विद्या मोरे १०० मी.धावणे- प्रथम, वैशाली शेळके २०० मी.धावणे- द्वितीय, वैष्णवी धोंगडे ४०० मी.धावणे-प्रथम, आरती खिल्लारी ८०० मी.धावणे- प्रथम, श्रुती गवळी लांब उडी-द्वितीय,१५०० मी.धावणे- द्वितीय, ४×१०० मी. रिले मध्ये-प्रथम- वैशाली शेळके,वैष्णवी धोंगडे, आरती खिल्लारी, रूपाली लठाड व अर्चना खिल्लारी तसेच ४×४०० मी. रिले-प्रथम-वैष्णवी धोंगडे,अर्चना खिल्लारी,ऋतिका गवळी,वैष्णवी करवते व आरती खडसे तसेच १९ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये ४×४०० मी. रिले-प्रथम मध्ये गोपाल गायकवाड, प्रतीक सरनाईक, कृष्णा गवळी, प्रतीक नालटे, ओम गवळी, साई देशमुख चा समावेश होता.

    या सर्व विजयी  खेळाडूंचा विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गवळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक एन.डी. भिंगे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  व्हि.के.खिल्लारे, आर.बी.नव्हाळे, पी.एस.सरनाईक, ओ.एल.सरकटे, एस.एस.ठाकरे, व्ही. बी. गवळी,डी.जी.तागड  हे उपस्थित होते  विजयी खेळाडूंवर गावातील सर्व नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

0 Response to "शंकरराव गवळी विद्यालयाचे १९ खेळाडू जिल्हास्तरावर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article