-->

कारंजा एस.डी.ओ श्री. वऱ्हाडे यांची उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाला भेट

कारंजा एस.डी.ओ श्री. वऱ्हाडे यांची उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाला भेट

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कारंजा एस.डी.ओ श्री. वऱ्हाडे यांची उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाला भेट  


आरोग्यविषयक सुविधांची केली पाहणी 


दोन्ही रुग्णालयात पुरेसा औषधी साठा उपलब्ध


वाशिम  कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी आज 7 ऑक्टोबर रोजी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सोयी सुविधांची पाहणी करून रुग्णालयाशी संबंधित बाबींचा आढावा घेतला.यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते.यावेळी कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.आर.साळुंके यांच्याकडून रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली.    

                  कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे 100 खाटांचे आहे.येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची 13 पदे मंजूर असून त्यापैकी 9 पदे भरलेली आहे.4 जी पदे रिक्त आहेत,ती एम.बी.बी.एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे.कार्यरत असलेल्या 9 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी 2 वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के व डॉ. बालाजी हरण हे प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालय,वाशिम येथे कार्यरत आहे.डॉ.श्रीमती बोन्द्रे  वैद्यकीय अधिकारी ह्या वैद्यकीय रजेवर आहेत.डॉ.गावंडे यांनी 2 वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे.त्यामुळे सध्या 4 वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. बी.ए.एम.एस.चे एक वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहे.मात्र भुलतज्ञ कार्यरत नाही.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील 5 वैद्यकीय अधिकारी असून यामध्ये 2 आयुष आणि 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.एक दंत चिकित्सक असून बालरोगतज्ज्ञ,नेत्ररोगतज्ञ व अस्थिरोग तज्ञ हे विषयतज्ञ कार्यरत आहे.उर्वरित वैद्यकीय अधिकारी हे एमबीबीएस आहेत.रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. 

         कारंजा उपजिल्हा रुग्णालयात सर्जन,फिजिशियन व भुलतज्ञ नाहीत. स्त्रीरोग तज्ञ हे पद कायम स्वरूपी पाहिजे आहे.पॅरामेडीकलची एकूण 60 पदे मान्य आहे.त्यापैकी वर्ग 3 ची 52 पदे मान्य आहे.त्यापैकी 24 पदे रिक्त असून 28 पदे भरली आहे.वर्ग 4 ची 8 पदे मान्य असून 2 पदे भरली आहे तर 6 पदे रिक्त आहे.4 कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे.ह्या चार प्रतिनियुक्तीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.उपजिल्हा रुग्णालयात सी-आर्म मशीन नसून तिची आवश्यकता आहे.डेंटल चेअर, सोनोग्राफी व सीटी-स्कॅन मशीन आहे. तिची सेवा पुरविणारी यंत्रणा व्यवस्थित नाही.2 रुग्णवाहिका उपलब्ध आहे.आरोग्य शाळेसाठी 3 गाड्यांची आवश्यकता आहे.तसेच रुग्णालयात रक्तपेढी व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे.तसेच पुरेसे सुरक्षा रक्षक नाही.बायो मेडिकल कंपार्टमेंटची  तसेच बायोमेट्रिक मशीनची देखील आवश्यकता आहे. 

                    औषधांचा पुरवठा मागणीनुसार करण्यात येतो.सर्पदंश अँटिरेबीज लसीचा साठा पुरेशाप्रमाणात आहे.सीबीसीसाठी मशीन व केमिकलची आवश्यकता आहे. लॅब मटेरियल आणि रक्त साठवणुकीसाठी पुरेशे अनुदान नाही. त्यासाठी अनुदानाची आवश्यकता आहे.ऑक्सिजन प्रकल्प सुरू नाही. तो आवश्यकतेनुसार इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यास हरकत नाही.     

               कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांचे असून वैयक्तिक अधीक्षक हे पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी दोन कार्यरत आहे.वर्ग 3 ची 15 पदे मंजूर असून 12 पदे भरली आहे. वर्ग चारची 7 पदे मंजूर असून त्यापैकी 5 पदे भरली आहे. शस्त्रक्रियागृह 15 वर्षापासून बंद आहे.ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे.शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर येथे उपलब्ध नाही.एक रुग्णवाहिका असून पोस्टमार्टम रूममध्ये विद्युत व पाण्याची व्यवस्था नाही.रुग्णांसाठी औषधांची मात्र अडचण नसल्याची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

0 Response to "कारंजा एस.डी.ओ श्री. वऱ्हाडे यांची उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाला भेट "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article