
जगदीश नायक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
साप्ताहिक सागर आदित्य
जगदीश नायक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नगर पालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शाळा, आदर्श तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याध्यक्ष अर्जुन कोळी सरांनी जाहीर केले.त्यामध्ये नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रं 04 येथे कार्यरत नवोपक्रमशील शिक्षक , समाजाबद्दल तळमळ असणारे सेवाभावी शिक्षक जगदीश गणेशराव नायक यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत राज्य संघाचे अमरावती विभागीय अध्यक्ष संतोष राठोड सर आणि वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोष मांगुळकर यांनी शिफारस करुन जगदीश गणेशराव नायक सरांना या वर्षाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरविले.
तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.त्यानिमीत्ताने शाळेमध्ये नायक सरांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व्ही जी वाघमारे, ज्येष्ठ शिक्षक बी एस सायगुंडे, सौ.एम.ए.खुणे, कु.एम.एस. गिर्हे, सौ.सुप्रीया खडसे, अमरावती विभागीय अध्यक्ष संतोष राठोड, शिपाई आनंद क्षीरसागर यांनी सत्कार केला.
तसेच पुरस्कार वितरण पनवेल येथील राज्यव्यापी कार्यक्रमात दि ८ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच दिपक केसरकर शिक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. नगर परिषद शाळा क्रं 4चे मुख्याध्यापक व्ही जी वाघमारे यांनी राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, राज्यकार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे,राज्यसरचिटणीस अरुण पवार,राज्य उपाध्यक्ष सौ.ज्योत्स्ना भरडा, राज्य संपर्क प्रमुख विनोद चव्हाण,राज्य सहसरचिटणीस संजय चूनारकर, अमरावती विभागीय अध्यक्ष संतोष राठोड, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनिल जाधव वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोष मांगुळकर व इतर पदाधिकारी यांचे आभार मानले
0 Response to "जगदीश नायक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार"
Post a Comment