
लोकनेते भाऊसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी पश्चिम विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून
साप्ताहिक सागर आदित्य
लोकनेते भाऊसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी पश्चिम विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून शुभेच्छा साठी उसळला जनसागर . महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री वाशिम जिल्ह्याचे माजी खासदार विदर्भाचे लोकनेते व जनसामान्यांचा आधार अशी ख्याती असलेले गोरगरीब जनतेचा आधार असलेले अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिसोड येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती . असतो अनंतरावजी देशमुख यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या गोरगरीब जनसामान्य जनतेसाठी एक उत्सवच अनंतरावजी देशमुख यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता स्नेही किंबहुना विरोधकही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतो . विदर्भ विशेषता पश्चिम विदर्भातून कानाकोपऱ्यातून लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रिसोड येथे येतात . मागील पंचवीस वर्षापासून कोणते राजकीय पद नसलेले परंतु लोकांच्या हृदयात आपल्या कामाने स्थान बनवून पत असणारे पश्चिम विदर्भातील एकमेव लोकनेते म्हणून अनंतरावजी देशमुख यांचे नाव अधोरेखित झाले आहे . दररोज जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या समस्या समजून त्या मार्गी लावण्यासाठी गोरगरीब जनतेचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात अनंतरावजी देशमुख हे वाशिम जिल्ह्यात अग्रक्रमावर आहेत . " पद नसेल परंतु त्यांचा दरारा त्यांचे कामाची शैली त्यांचे वक्तृत्व हे कायम आहे . या कामाच्या भरोशावर दांडगा जनसंपर्क यामुळे ते जनतेत अतिशय लोकप्रिय आहेत . त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध विभागाचे आमदार , जिल्हा परिषद सदस्य , माजी आमदार विविध पक्षाचे पदाधिकारी , पंचायत समिती सदस्य खरेदी - विक्री सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गावचे सरपंच उपसरपंच सदस्य , आणि विशेष म्हणजे जनसामान्य गोरगरीब यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती . रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेत लोकनेते भाऊसाहेब यांचा जन्मदिवस साजरा झाला भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी .. सर्व धर्माच्या समाजाच्या पंथाच्या लोकांनी रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेत त्यांच्या लाडक्या नेत्यास भेटून शुभेच्छा दिल्या . सोशल मीडिया भाऊसाहेब अनंतरावजी देशमुख यांचा वाढदिवस १ ९ ऑगस्ट परंतु त्यांच्या स्नेही जन कार्यकर्ते गोरगरीब व जनसामान्य यांनी शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडिया वरती सुरू केला होता जिल्ह्यातील बहुतांश ग्रुप वरती अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया वापर करणारी मंडळी यांनी सुरुवात केली होती . भाऊसाहेबांचा वाढदिवस आणि पाऊस संयोग कायम अनंतराव देशमुख यांचा वाढदिवस आणि खंड पडलेला पाऊस १ ९ ऑगस्ट रोजी येणार हा दरवर्षीचा संयोग याही वर्षी कायम राहिला जणू वरून राजा अनंतरावजी देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठीच अनेक दिवसाच्या खंड दिल्यानंतर अवतरला . मागील बऱ्याच दिवसापासून पावसाने खंड दिला होता त्यामुळे शेतकरी राजाही चिंतेत होता परंतु १ ९ ऑगस्ट येतोच पाऊस येणारच अशी चर्चाही गावागावात रमली होती आणि झालं तसच लोकनेते भाऊसाहेब यांच्या जन्मदिवशी वरून राजाने हजेरी लावली अनंतरावजींच्या जन्मदिनीच शेतकरी राजा सुखावला . सामाजिक उपक्रमांचे आयोजन लोकनेते भाऊसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आठवड्यापासूनच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये रक्तदान शिबिर विद्यार्थ्याचा सत्कार , आरोग्य तपासणी शिबिर , वृक्षारोपण सहित विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांच्या प्रेमीजनाकडून कार्यकर्त्याकडून करण्यात आले होते . लोकनेते अनंतरावजी देशमुख यांचा हा पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा बाढदिवस त्यांचे कार्यकर्ते , गोरगरीब जनसामान्य व असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रेमरूपी शुभेच्छांच्या वर्षात साजरा झाला .
0 Response to "लोकनेते भाऊसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी पश्चिम विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून"
Post a Comment