-->

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना 


वाशिम  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 18 वर्षाआतील 15 मुलांना 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रियेसाठी अपोलो हॉस्पिटल मुंबईकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या बालकांना पुष्प दिले.

                जिल्हा रुग्णालय,वाशिम कार्यालयामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाडीमध्ये वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी केली जाते.जिल्हा शासकीय रुग्णालय, वाशिम येथे 11 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या 2 D Echo संदर्भ सेवा शिबिरामध्ये 33 मुलांच्या हृदयाची तपासणी केली असता 15 मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वाशिम अंतर्गत त्यांच्यावर मोफत हृदयशस्त्रक्रीया व उपचार करण्यासाठी नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

           या मुलांना मुंबईकडे रवाना करतेवेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचेसह जिल्हा शल्यचिकित्सक धर्मपाल खेडकर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश मोरे, बाह्यरुग्ण संपर्क अधिकारी डॉ.पराग राठोड,मेट्रन सरिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आकाश ढोके,जिल्हा कार्यक्रम सहायक तुषार ढोबळे,एफएलसी निलेश राजपूत, फार्मासिस्ट राहुल राठोड,अंकुश कदम,विश्वकर्मा खोलगडे,प्रदीप भोयर,ज्योती तायडे,दिशा राठोड, दीपाली उबाळे,पुष्पा वेळूकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 15 मुले हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article