-->

राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या #परीक्षा घेत आहे.

राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या #परीक्षा घेत आहे.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या #परीक्षा घेत आहे. कुठल्याही गैरप्रकारास वाव नाही. परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनाही दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेवेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत #पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या #पदभरती परीक्षा घेण्यात येत आहेत. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 Response to "राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या #परीक्षा घेत आहे."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article