-->

विशेष सहाय्य योजना  15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

विशेष सहाय्य योजना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले



साप्ताहिक सागर आदित्य 

विशेष सहाय्य योजना

15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले


वाशिम, :  विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत संबंधित सेतू संचालक व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.



0 Response to "विशेष सहाय्य योजना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article