
भाऊसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना गणवेश व खाऊ वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
भाऊसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना गणवेश व खाऊ वाटप रिसोड- स्थानिक भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या वतीने इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना आदरणीय अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप आणि बाकी सर्व विद्यार्थिनींना खाऊ(लाडू) प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम विलासराव देशमुख सर प्रभारी पर्यवेक्षक सुधीर देशमुख सर या सर्वांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम भाऊसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या शाळेमध्ये मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. या दिवसाची विद्यार्थिनी आतुरतेने वाट बघत असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी भाऊसाहेबांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अगणिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळेतील प्राचार्या ,पर्यवेक्षक सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी केक कापून व बुके देऊन शुभेच्छा दिल्या. भाऊसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील साहेबांना मानणारा चाहता वर्ग यांनी दिवसभर भारत माध्यमिक शाळेच्या स्व. विठ्ठलराव देशमुख सभागृहामध्ये शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी अलोट गर्दी पसरली होती. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा जिल्ह्यातील लोकांचा जनसागर पसरला होता. आलेल्या सर्वांना चहा व नाश्त्याची व्यवस्था केलेली होती.
0 Response to "भाऊसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना गणवेश व खाऊ वाटप"
Post a Comment