
जि.प. सेस फंड योजना पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे जि.प.समाज कल्याण विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
जि.प. सेस फंड योजना
पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे
जि.प.समाज कल्याण विभागाचे आवाहन
वाशिम, वाशिम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सन २०२२-२३ मधील ५ टक्के सेस फंड या योजनेचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
पात्र दिव्यांग लाभार्थी हा दोन्ही डोळयांनी अंध असल्यास लाभार्थ्याला इलेक्ट्रीक काठी,दोन्ही पायांनी दिव्यांग लाभार्थ्यास इलेक्ट्रीक सायकल,कानानी ऐकू येत नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यास कानाची मशीन पुरविणे,दिव्यांग गरजुंना लॅट्रीन चेअर पुरविणे,व्हील चेअर पुरविणे,त्याला उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन पिठगिरणी पुरविणे आदी योजना
राबविण्यात येत आहे.
तरी गरजू असलेल्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यात १८ नोव्हेंबरपर्यंत विविध साहित्य व योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करावा.या योजनेचे अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,वाशिम यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले आहे.
0 Response to "जि.प. सेस फंड योजना पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे जि.प.समाज कल्याण विभागाचे आवाहन"
Post a Comment