
शासन आपल्या दारी घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान
साप्ताहिक सागर आदित्य
शासन आपल्या दारी
घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान
वाशिम, : रिसोड तालक्यातील ज्या शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका फाटलेल्या असतील, वापरण्या योग्य नसतील किंवा गहाळ झाल्या असतील. अशा शिधापत्रिकाधारकांना दुय्यम शिधापत्रिका आवश्यक असल्यास संबंधित गावचे रास्तभाव दुकानदार यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज भरावा. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जसे विहीत नमुन्यात अर्ज, जुन्या शिधापत्रिकाची छायांकीत प्रत, शिधापत्रिकामधील सर्व लाभार्थ्याचे आधार कार्डची छायांकीत प्रत जमा करण्यात यावी. जेणेकरुन संबंधित शिधापत्रिकाधारकास दुय्यम शिधापत्रिका घरपोच देण्यात येतील. तरी शासन आपल्या दारी या नाविन्यपुर्ण योजनेतून राबविण्यात येणाऱ्या या घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियानाचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन रिसोड तहसिलदार यांनी केले आहे.
0 Response to "शासन आपल्या दारी घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान"
Post a Comment