-->

पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी  यंत्रणांनी सज्ज राहावे                                                                                            -जिल्हाधिकारी  षण्मुगराजन  आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा


 

साप्ताहिक सागर आदित्य 

पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी

यंत्रणांनी सज्ज राहावे

                                                                                          -जिल्हाधिकारी  षण्मुगराजन

आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

       वाशिम,  :  लवकरच येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. ग्रामीण व शहरी भागात विद्युत तारांना खोळंबा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडाव्यात. भूमिगत गटार व नालेसफाईची कामे तातडीने पुर्ण करावी. रत्त्यांवर पडलेली खड्डे त्वरीत बुजविण्यात यावी. येत्या पावसाळ्यात पुरामुळे, रोगराईने तसेच वीज पडून नागरीकाला जीव गमावण्याची वेळ येणार नाही, यासाठी होणारी जीवीत व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, मृद व जलसंधारण विभागाच्या सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपूर्णा नानोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

            षण्मुगराजन पुढे म्हणाले, मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावी. पूरबाधित होणाऱ्या गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास बाधित नागरीकांचे योग्य ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी निवाऱ्याची ठिकाणे आधीच निवडावी. ज्या इमारती धोकादायक आहेत, त्या इमारतीच्या मालकांना नोटीस द्यावी. ग्रामीण व शहरी भागातील धोकादायक इमारतीची यादी तयार करुन ठेवावी. शाळांच्या धोकादायक खोल्यात विद्यार्थ्यांना बसवू नये. अंगणवाडीच्या धोकादायक इमारतीमध्ये सुध्दा मुलांना बसवू नये. पर्यायी व्यवस्था म्हणून शाळेतील खोल्यात मुलांना बसवावे. मोठ्या ग्रामपंचायती आणि नगर पालिका क्षेत्रात नाले व भूमिगत गटारांची साफसफाईची कामे तातडीने हाती घ्यावी. त्यामुळे अशा गावात व शहरात रोगराई पसरणार नाही या बाबत पंचायत समिती व नगर पालीकेने दक्ष राहावे. असे ते म्हणाले.

           गावाला लागूनच वाहणाऱ्या नाल्यांच्या दोन्ही काठावरील झाडाझूडपांची साफसफाई करण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी गावात येणार नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून ही झाडेझूडपे तोडावी. सिंचन प्रकल्पांच्या भिंतीवर व कालव्यावर असलेली झाडे तोडण्यात यावी. या झाडांमुळे प्रकल्प व कालव्यांना भेगा पडून त्यामधून पाणी वाहू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी संबंधित झाडे पावसाळ्यापूर्वी तोडण्यात यावी. असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

           षण्मुगराजन पुढे म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पुरेशा प्रमाणात या केंद्रात 24 तास उपलब्ध राहावे. दूरसंचार विभागाने पावसाळ्याच्या दिवसात संपर्क व इंटरनेट सेवा कोलमडणार नाही याकडे लक्ष द्यावे .पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

          सभेला तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे इतरही अधिकारी यांची उपस्थिती होती.



Related Posts

0 Response to "पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article