-->

18 वर्षावरील 5 लाख 69 हजार    लाभार्थ्यांना मिळणार बुस्टर डोस

18 वर्षावरील 5 लाख 69 हजार लाभार्थ्यांना मिळणार बुस्टर डोस



साप्ताहिक सागर आदित्य 

 18 वर्षावरील 5 लाख 69 हजार  

लाभार्थ्यांना मिळणार बुस्टर डोस

      वाशिम,  : जिल्हयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दररोज आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवरुन वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय संशोधकाच्या अथक परिश्रमातून कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली. 16 जानेवारी 2021 पासून देशात कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. कोरोना लसीकरणाची ही मोहिम देशभर मोठया प्रमाणात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही पात्र व्यक्ती कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करीत आहे. आता ज्यांनी पहिला आणि दुसरा कोविड लसीकरणाचा डोस घेतला आहे आणि दुसरा डोस घेऊन 6 महिने पुर्ण झाले आहे. अशा 18 वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाअंतर्गत 15 जुलै 2022 पासून बुस्टर डोस (वर्धक मात्रा) देण्यास सुरुवात झाली आहे. बुस्टर डोस देण्याचा हा कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थ्यांना 75 दिवसापर्यंत देण्यात येणार आहे.

         18 वर्षावरील लाभार्थ्यांने दुसरा डोस घेऊन 6 महिने पुर्ण झालेले आहे, अशा जिल्हयातील 5 लाख 69 हजार 610 लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा बुस्टर डोस देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. कोव्हॅक्सीन लसीचा डोस घेतलेल्या 2 लाख 94 हजार 793 लाभार्थ्यांना आणि कोविशिल्ड लसीचा डोस घेतलेल्या 2 लाख 74 हजार 817 लाभार्थ्यांना हा बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन बुस्टर डोस घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  


                                                                                                                                      

Related Posts

0 Response to "18 वर्षावरील 5 लाख 69 हजार लाभार्थ्यांना मिळणार बुस्टर डोस"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article