-->

मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित

मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित


साप्ताहिक सागर आदित्य 

मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित

          वाशिम,  : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या करीता पात्र व्यक्ती/ संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेची वैशिष्टे- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुक आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येणार आहे. विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्याकरीता या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- वैयक्तिक मधपाळ - ५ ते १० मधपेटया (१० मधपेटया ईतर साहित्याचे संच ५४ हजार रुपये, ५० टक्के अनुदान २७ हजार रुपये मिळणार आहे.

          यासाठी पात्रता - अर्जदार साक्षर असावा. स्व:ताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक, केंद्र चालक प्रगतशिल मधपाळ - व्यक्ति पात्रता किमान १० वी पास असणे आवश्यक, वय वर्ष २१ पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी, केंद्र चालक संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १ हजार चौ.फुट सुयोग्य ईमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता सुविधा असावी. केंद्र चालकास २५ ते ५० मधपेटया ५० मधपेटया ईतर साहित्य संच २ लक्ष ११ हजार प्रमाणे ५० टक्के अनुदान. मधपाळाला 10 मधपेट्टया घेण्यासाठी ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के रक्कम १५ हजार ५०० रुपये सुरुवातीस कार्यालयास जमा करणे अनिवार्य आहे. यासाठी अटी व शर्ती - लाभार्थी निवड प्रक्रीयेनतंर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंदपत्र लिहून देणे अनिवार्य राहिल. मडंळामार्फत प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहणार आहे.

         अधिक माहितीकरीता संपर्कासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जिवन बोथिकर भ्रमणध्वनी क्रमांक 8010428212, औद्योगिक पर्यवेक्षक डी. एस. राउतराव 9689200239  अथवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दागडीया सदन तहसिल कार्यालयासमोर सिव्हिल लाईन, वाशिम येथे दूरध्वनी क्रं. 07252-233882, संचालक मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला क्रमांक ५ महाबळेश्वर, जि. सातारा पिन कोड- 492806, दूरध्वनी क्रमांक 02968-260264 यावर संपर्क साधावा. वरील प्रमाणे योजनेची वैशिष्टये, अटी व शर्ती पुर्ण करुन त्याप्रमाणे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयास सादर करावे. त्यानुसार संस्था व व्यक्ती निवडी बाबतचा विचार करण्यात येईल. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.







0 Response to "मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article