-->

शेतकऱ्यांपेक्षा 'गोविंदा' बरे      विष्णुपंत भुतेकर

शेतकऱ्यांपेक्षा 'गोविंदा' बरे विष्णुपंत भुतेकर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकऱ्यांपेक्षा 'गोविंदा' बरे

    विष्णुपंत भुतेकर 

   संस्थापक अध्यक्ष

       भूमिपुत्र

   शेतकरी संघटना

      आत्महत्या करून शेतकऱ्यांना मोठया महत प्रयासाने कसी तरी एक लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. त्यातही काही नगदी काही उधार, अनेक अटी शर्ती आणि पुन्हा पात्र /आपत्र.  या पेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी धरतीची छाती फोडून पीढयान पीढया काबाडकष्ट करून शेती केल्या पेक्षा दहीहंडीत सहभाग घेऊन मडक फोडलेले केंव्हाही चांगले. गोविंदा होवुन मडक फोडतांना जीव गेला  तर दहा लाख नगदी, जखमी होऊन अवयव निकामी झाला तर सात लाख, साधा जखमी आसेल तर पाच लाख, किरकोळ जखमींना मोफत उपचार. आयुष्यभर शेतकरी होवुन काय मिळणार फक्त आयुष्यमान भारत चे कार्ड, त्या पेक्षा गोविंदा बना. असा उपरोधिक सल्ला विष्णुपंत भुतेकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

     राज्यातील मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसीं, वडार, ब्राह्मण अनेक जाती अनेक वर्षांपासून शिक्षणात आणि नोकर्‍यात आरक्षण मागत आहेत. किती खुळे पणा करतात,   गोविंदा व्हा आणि आरक्षण मिळवा. शेतकऱ्यांच्या पोरांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासापेक्षा गोविंदा व्हावुन एक दिवस 'मडके' फोडलले बरे .  

     शेतकरी अत्महत्या, पीककर्ज, पीक विमा, वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास, मजुर टंचाई, वीज टंचाई असे अनेक प्रश्न आहेत.  राज्यात थ्रेशरने मळणी करतांना हजारो शेतकर्यांचे अक्षरशः तुकडे झालेत. काहीचे हात पाय तुटुन गेलेत त्यांना पाहायला सुध्दा सरकारकडे वेळ नाही.  साप, विंचु, रानडुक्करांचे हल्ले यात हजारो शेतकरी दरवर्षी जखमी होतात थातूरमातूर मदत करून शेतकऱ्यांना वाटी लावले जाते . शेतकऱ्यांसाठी असलेल्या स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेचा व शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यां साठी असलेल्या अपघात विमा योजनेचा आढावा घेऊन सरकारने कृषी विभागामार्फत व विद्यार्थांना शिक्षण विभागाकडून सरळ मदत दिली पाहीजे ही भूमिपुत्र ची अनेक वर्षांपासून मागणी आहे त्या साठी सरकारकडे  वेळ नाही. पंरतु मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून 'गोविंदा' साठी घेतलेला निर्णय  'राजकारणा साठी वाट्टेल ते' हे सिध्द करतो. खेळाला महत्त्व आहेच परंतु त्याला समाज जीवनात किती राजाश्रय आसावा याच भान हवे. 

   राज्यातील शेतकऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी येणार्या काळात अंतर्मुख होण्याची ही वेळ आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

0 Response to "शेतकऱ्यांपेक्षा 'गोविंदा' बरे विष्णुपंत भुतेकर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article