-->

लोकनेते अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर

लोकनेते अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर


साप्ताहिक सागर आदित्य/

लोकनेते अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर
■ विदर्भातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्याची रिघ
■ मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमाचे आयोजन
रिसोड - महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री वाशिम जिल्ह्याचे माजी खासदार विदर्भात त्यांना लोकनेते म्हणून सामान्यांकडून संबोधले जाते , असे अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी विदर्भातील कानाकोपयातून जनसागर उसळला आहे . १ ९ ऑगस्ट रोजी माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचा जन्मदिवस हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक सणच हा सण साजरा करण्यासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते स्नेही मित्रपरिवार विविध पक्षातील पदाधिकारी विविध पक्षाचे नेते हे रिसोड येथे हजेरी लाऊन त्यांना शुभेच्छा देतात .

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी माजी खा . अनंतराव देशमुख यांना दिल्या शुभेच्छा
 ● जिल्हा व इतर विभागातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सदस्य , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य , खरेदी विक्रीचे सदस्य , नगरपरिषद सदस्य , आजी - माजी आमदार , माजी खासदार , राज्यातील नेत्यांनी दूरध्वनीद्वारे अनंतराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

तसेच जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते . याहीवर्षी अतिशय मोठ्या आणि अफाट संख्येने विदर्भातुन
लोकांनी लोकनेत्यास शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती . यावेळी माजी खा . अनंतराव देशमुख यांचा जन्मदिवस भारत माध्यमिक शाळा रिसोड येथील स्वर्गीय विठ्ठलराव देशमुख समागृह येथे आयोजित करण्यात आला होता . जिल्ह्यातील सोशल मीडिया हा अनंतराव मय झाला होता . फेसबुकवर शुभेच्छांचा पाऊस पडत होता . गोरगरीब , श्रीमंत , व्यापारी , दुकानदार शेतकरी , कष्टकरी सर्वांनी भेटून शुभेच्छा दिल्या नागरिकांसाठी असलेले हे लोक नेतृत्व असल्याने नागरिकही त्यांना त्यांच्या जन्मदिनी भरभरून स्नेहरूपी शुभेच्छा देतात . त्याचाच प्रत्यय अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकाला दिसून आला . व माजी खा . अनंतराव देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या विदर्भातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटीबध्द असतात ! माजी खा . अनंतराव देशमुख यांचा सतत दांडगा जनसंपर्क सामान्य माणसाचे समस्या त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सदैव कटीबध्द असतात . त्यांच्या जनसंपर्क कार्यालय रिसोड येथे सदैव एक प्रकारे जनता दरबार भरलेला असतो . राजकारणाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत माजी खा . अनंतराव देशमुख सतत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या नेहमीच संपर्कात असतात . कानाकोपऱ्यातून आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या या लोकनेत्यास जन्मदिनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या . यावेळी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्नेही , मित्र , कार्यकर्ते , गोर गरीब शेतकरी , कष्टकरी व मित्रपरिवारांचे मा . मंत्री अनंतरावजी देशमुख यांनी आभार व्यक्त केले . अशाप्रकारे विदर्भाच्या लोक नेतृत्वास शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः जनसागर उसळला होता .








0 Response to "लोकनेते अनंतराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article