अंगणवाडी केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
अंगणवाडी केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी
अंगणवाडी केंद्रातील सेविका मदतनीस व बालगोपाल यांच्या मदतीने व समन्वयाने श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव सर्व अंगणवाडी केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान लहान बालगोपाल व राधा यांनी अंगणवाडी
परिसर दुमदुमून गेला होता. दहीहंडी फोडण्यात चा उत्साह तर या बालगोपालांमध्ये ओसंडून वाहत होता आणि यांना बघून मोठ्यांना कमालीचे समाधान व आनंद मिळत होता. प्रियंका बोरकर यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तर या विशिष्ट प्रसंगी बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच मीना मुंधरे यांच्या अंगणवाडी केंद्रात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी समाप्तीनंतर बालकांना बक्षीस सुद्धा देण्यात आले. नंदा गोटे यांच्या अंगणवाडी केंद्रातील बालके राधाकृष्ण गवळण अवतारात आली होती. सर्वांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंद लुटला.या अनुषंगाने भारताच्या वैविध्यपूर्ण पौराणिक संस्कृतीचा परिचय बालकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
0 Response to "अंगणवाडी केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी"
Post a Comment