वाशिम ते शिरपूर शिरपूर ते वाशिम बस सेवा त्वरित चालू करा तसेच मालेगाव ते येवती पूर्वी सुरू असलेला (हल्टिंग) बस सेवा टाईम सुरू करा
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम ते शिरपूर शिरपूर ते वाशिम बस सेवा त्वरित चालू करा तसेच मालेगाव ते येवती पूर्वी सुरू असलेला (हल्टिंग) बस सेवा टाईम सुरू करा - राजू भाऊ लहाने,सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे
शिरपूर ते वाशिम या रोडवर शिरपूर करंजी, ब्राह्मणवाडा,चिवरा,वाकद फाटा तामसी,सोनखास,लगतची गावे येथील मुख्यतः विद्यार्थी वाशिम येथे दररोज येजा करतात, काही दिवसा अगोदर बस सेवा चालू असताना ही बस अचानक बंद झाली आणि लवकरच ही बस चालू करा यासाठी आगार प्रमुख वाशिम यांना निवेदनाद्वारे लक्षात आणून दिले आहे राजू भाऊ लहाने, सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी बस ताबडतोब चालू करावी अशी मागणी केली आहे , दरम्यान वाशिम येथे मोठे दवाखाने असल्याकारणाने मुख्य बाजारपेठ देखील असल्याकारणाने सर्व लोकांना सतत याच रस्त्याने जावे लागते, त्यामुळे आजारी रोगी यांना व्यक्तिगत वाहन किंवा खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही, रोजच विद्यार्थी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या परिसरातील गावकरी यांना कठीण सामना करावा लागत आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरीही बस वाशिम ते शिरपूर शिरपूर ते वाशिम व मालेगाव ते येवती हा पूर्वीचा टाईम परत सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे व राष्ट्रवादी चे नेते राजू भाऊ लहाने यांनी केली आहे,, ही व सेवा उपलब्ध झाल्यास सर्वांना सोयीस्कर आहे व शिवाय खाजगी वाहणा ऐवजी महामंडळाला देखील नियमित भाडेही मिळेल विविध अडचणी समजून घेता आज मुख्य आगार प्रमुख यांना निवेदन दिले
,,आहे.
0 Response to "वाशिम ते शिरपूर शिरपूर ते वाशिम बस सेवा त्वरित चालू करा तसेच मालेगाव ते येवती पूर्वी सुरू असलेला (हल्टिंग) बस सेवा टाईम सुरू करा"
Post a Comment