जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा
रक्षाबंधन हा सण बहीण भाऊ यांच्या मधील प्रेमाचा सण.....बहिणीने धागा बांधला म्हणजे बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी प्रथा आहे.इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत.रक्ताचे नाते नसतांना केवळ रक्षा धागा बांधला तरी संरक्षणाची जबाबदारी पार पाडली. वृक्ष लागवड तर केली जाते परंतु संवर्धन मात्र होत नाही .वृक्षांनाच भाऊ मानून राखी बांधली तर...मुले वृक्षाची काळजी घेतील.त्यांचे संवर्धन होईल.हीच संकल्पना घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ही संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांनी मांडली.सर्व शिक्षकांनी त्याला संमती दिली.या संकल्पनेने शाळेत अनेक वृक्ष जगले आहेत.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर,शिक्षक रतन पट्टेबहादुर,तुकाराम इंगळे,विठ्ठल कालवे,संमती पंचवाटकर यांची उपस्थिती होती.
0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा"
Post a Comment