-->

जिल्हा परिषदेत ई फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातुन

जिल्हा परिषदेत ई फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातुन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषदेत ई फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातुन

गतिमान आणि पारदरर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न: चंद्रकांत ठाकरे

वाशिम: 

ई फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातुन गतीमान व पारदर्शक प्रशासन देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने ई- फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या उपकरातुन (सेस फंड) साकारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजनांचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत, सामान्य प्रशासनविभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हा परिषदेच्या उपकरातुन  (सेस फंड) तयार करण्यात आलेल्या अभिलेख कक्षाचे आणि व्हि. सी. रुमचे उद्घाटनही स्वातंत्य्  दिनाचे औचित्य साधुन करण्यात आले.  तसेच कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी फेस रिडिंग बायोमॅट्रीक सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले.  पशु संवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उप मुख्य वित्त व लेखाधिकारी तुषार मोरे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ. देशमुख, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखडे, एमआरईजीएसचे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने आदि विभाग प्रमुखांसह जि. प. च्या कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती





0 Response to "जिल्हा परिषदेत ई फायलिंग व ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातुन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article