
जुनी पेंशन करिता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना पुकारले संप
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम :- जुनी पेंशन करिता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना पुकारले संप
संपूर्ण राज्यात दिनांक १४ मार्च २०२३ पासून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळविण्यासाठी राज्यभरात संप पुकारले आहे. नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना सरकारने बंद केली आहे. कर्मचारी आपल्या आयुष्याचे ५८ वर्षे नोकरीमध्ये पुर्ण करुन निघतो तेंव्हा नंतर तो काही ही करू शकत नाही तरी त्याला निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्या करिता शासनाने पेंशन चा आधार दिला होता पण २००५ नोव्हेंबर नंतर चे कर्मचाऱ्यांना तो योजना बंद करण्यात आली २००५ नंतर चे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना देण्यात यावी करिता वाशीम जिल्ह्यातील सर्व तहसील ठिकाणी संप पुकारले सर्व कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी बसलेले आहे. वाशीम येथील शिक्षकांच्या सर्व संघटनांनी समन्वय समिती द्वारे सर्व शिक्षकांना संपात १००% सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. अशी अपेक्षा आहे की दिनांक २०/३ /२०२३ सोमवार पासून १००% शिक्षक संपात सहभागी होणार.
0 Response to "जुनी पेंशन करिता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना पुकारले संप"
Post a Comment