प्रहार दिव्यांग संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित
साप्ताहिक सागर आदित्य
प्रहार दिव्यांग संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित
वाशिम : स्थानिक वाशिम येथे जिल्हा शिक्षक पतसंस्थेमध्ये आज प्रहार दिव्यांग संघटनेची राज्याध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली . या सभेमध्ये संघटनेची वाशिम जिल्हा कार्यकारीनी घोषित करण्यात आली . त्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वनाथ बोरकर यांची निवड करण्यात आली . उपाध्यक्ष वकिला उगले, केशव शिंदे , दीपक झळके , कार्याध्यक्ष सहदेव चंद्रशेखर , सचिव अनिल सुर्वे , कोषाध्यक्ष भागवत बोरकर , प्रसिद्धी प्रमुख अशोक झढवे , मार्गदर्शक भागवत मोहिरे , महिला प्रतिनिधी वंदना उखळकर , सहसचिव प्रवीण महाजन . इत्यादींची निवड या जिल्हा कार्यकारीनी मध्ये करण्यात आली . नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वनाथ बोरकर यांनी सर्व कार्यकारिणीचे आभार मानले व संघटनेचे काम एकनिष्ठेने करण्याचे मानस व्यक्त केले .
0 Response to "प्रहार दिव्यांग संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित "
Post a Comment