हुंडा पध्दत बंदसाठी समाजात जनजागृतीची गरज - उषाताई वानखेडे
साप्ताहिक सागर आदित्य
हुंडा पध्दत बंदसाठी समाजात जनजागृतीची गरज - उषाताई वानखेडे
अधुनिक काळात हुंडा देण्याची परंपरा अजूनही कायम
वाशिम ह हुंडा – हुंड्यासाठी छळ, विविध स्वीरूपातली हुंड्याची मागणी, हुंडाबळी आपल्या समाजात जात, धर्म यांनुसार खूप वेगवेगळ्या रूढी-परंपरा आहेत. त्यानुसार हुंडा घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. आधुनिक काळात हुंडा देण्याची परंपरा समाजात अजुनही कायम आहे, हुंडा पध्दत बंद होण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची गरज आहे, असे--- त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचा जरी औद्यौगीकीकरणामध्ये आणि शिक्षण क्षेत्रात विकास झाला किंवा होत असला असं म्हटलं जरी जात असलं तरी समाज अजूनही बुरसटलेल्या रूढी-परंपरा मध्ये अडकलेला आहे. अजूनही हुंड्यामुळे अनेक मुली-स्त्रिया याचे बळी जात आहेत. आपल्या समाजात पूर्वीपासूनच मुलगी दुसर्याच्या घरी जाणार म्हणून मुलीच्या आई-वडिलांना मुलाला व त्याच्या घरातील व्यक्तींना हुंडा देण्याची परंपरा आहे. त्यात आता तर हुंडा घेण्याचीही वेगवेगळी कारणं दिली जातात. मुलगा खूप शिकलेला असेल, चांगली नोकरी करत असेल आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी करत असेल तर आणखी मोठ्या रकमेचे हुंडे घेतले जातात, मुलींचं लग्नासाठीचं वय तीसच्या पुढे गेल असेल तर जास्त हुंडा द्यायचं, मुलींच्या दिसण्यावरून, मुलींना काही अपंगत्व असेल त्यानुसार हुंड्याची मागणी केली जाते. तसेच मुलगा सरकारी नोकरीत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात हुंडा मागितला जातो. ही पध्दत बंद होण्याची आवश्यकता आहे. असे--- त्यांनी सांगितले आहे.
हुंडा पद्धत बंदसाठी महिलांनीच पुढे यावे!
हुंडा आता फक्त पैशाच्या स्वरूपात राहिला नाही तर त्याच्या बदल्यात सोनं, फ्लॅट, गाडी, लग्न करण्याच्या पद्धती म्हणजे चांगले हॉल, खान-पान, सजावटी, कपडालत्ता यावर खर्च जास्त होतो. या सगळ्या सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी मुलींच्या घरातल्या कडून केली जाते. यासाठी बर्याच मुलींचे आई-वडील मुलीच चागलं होतंय म्हणून कर्ज काढून लग्न करतात.ही हुंडा पध्दत बंदसाठी महिलांनीच पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
0 Response to "हुंडा पध्दत बंदसाठी समाजात जनजागृतीची गरज - उषाताई वानखेडे "
Post a Comment