विभिषिका स्मृती दिवस वाशिम नगर परिषदेत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
विभिषिका स्मृती दिवस
वाशिम नगर परिषदेत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
वाशिम अखंड भारताची १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी होऊन देश भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशात विभागला गेला.१४ ऑगस्ट हा दिवस विभिषिका स्मृति दिवस म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले.देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो नागरिकांच्या सहवेदना तसेच विस्थापितांचे दुःख जनतेसमोर छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
विभिषिका स्मृती दिवसाचे औचित्य साधून आज १४ ऑगस्ट रोजी नगर परिषद वाशिम येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन वीरपत्नी मिराबाई नागुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाला नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रदर्शन पाहताना श्रीमती नागुलकर यांना अश्रू अनावर झाले.यावेळी श्रीमती नागुलकर यांचा साडी-चोळी देऊन मोरे यांनी सत्कार केला.
हे प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
0 Response to "विभिषिका स्मृती दिवस वाशिम नगर परिषदेत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन"
Post a Comment