‘विभाजन विभिषिका’ फाळणी स्मृती दिनानिमीत्त हॅपी फेसेसमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन.
साप्ताहिक सागर आदित्य
‘विभाजन विभिषिका’ फाळणी स्मृती दिनानिमीत्त
हॅपी फेसेसमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन.
वाशीम ७५ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी अखंड भारताची फाळणी होऊन देश भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांत विभागल्या गेला. फाळणीनंतर विस्थापित भारतीयांच्या वाट्याला आलेले दु:ख आणि संघर्ष देश विसरू शकत नाही. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतीदिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल अशी घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने वाशीम जिल्हा प्रशासनाच्यावतीने फाळणी स्मृती दिनाच्या अनुषंगाने चित्र प्रदर्शनाचे आयोजन वाशीम येथील हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कुल येथे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते या स्मृती चित्रप्रदर्शनाचे आज १४ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले.यावेळी हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कुलच्या संचालिका कविता हेडा, प्राचार्य प्रविण नसकरी,उपप्राचार्य ज्ञानेश्वर वाघ यांची उपस्थिती होती.
द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बहिणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले आणि आपला जीवही गमवावा लागला.त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ म्हणून स्मरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने ७५ वर्षापुर्वी देशात घडलेल्या त्या घटनेची माहीती देशवाशीयांना व्हावी म्हणुन दरवर्षी आता १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतीदिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.
स्व.यमुनादेवी शंकरलाल हेडा ऑडीटोरियममध्ये फाळणीवर आधारीत चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी वाशीम शहरातील नागरीकांचीही उपस्थिती होती.फाळणीनंतर देशात ७५ वर्षापूर्वी जी परिस्थिती उद्भवली होती त्या दुखद स्मृतीना उजाळा या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून मिळाला अशी माहीती प्राचार्य प्रविण नसकरी यांनी दिली.
0 Response to "‘विभाजन विभिषिका’ फाळणी स्मृती दिनानिमीत्त हॅपी फेसेसमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन."
Post a Comment