श्री.पांडुरंग विद्यालयात वृक्षरक्षाबंधन साजरा पिंपळा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयात वृक्षरक्षाबंधन साजरा
पिंपळा:-आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थींनीनी वृक्षांना राखी बांधून एक अनोखे वृक्षरक्षाबंधन साजरे केले.
आपल्या भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीचे पवित्र नाते जपणारा सण म्हणजे 'रक्षाबंधन'होय.वृक्ष हे कोणत्याही प्रकारचा जातीभेद न पाळता अनेक प्रकारे प्राणीमात्राला अविरतपणे निस्वार्थ सेवा देतात.याचेच दायित्व समजून विद्यालयातील विद्यार्थींनीनी विद्यालय परिसरातील अनेक वृक्षांना भाऊ समजून राख्या बांधल्या व त्यांना वाढविण्याची व जोपासना करण्याची जबाबदारी स्विकारली.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.एन.देशमुख तर प्रमुख पाहूणे म्हणून आमखेडा केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.इंदिरा राणे मॅडम ह्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.डी.कोरडे तर आभारप्रदर्शन एन.डी.भिंगे यांनी केले.यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 Response to "श्री.पांडुरंग विद्यालयात वृक्षरक्षाबंधन साजरा पिंपळा"
Post a Comment