स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा वाकद
साप्ताहिक सागर आदित्य
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा
वाकद- श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा 'वर्धापन दिन' अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम विद्यालयातील विद्यार्थ्यांची भव्य दिव्य प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी दरम्यान श्रीमती सावित्रीबाई अवताडे. सहकारी पतसंस्था,वाकद येथील ग्रा.पं.सदस्य गोपाल चोपडे व मित्रमंडळ,शेख सादीक यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून प्रभातफेरीचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे कोषाध्यक्ष तथा श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथील अध्यक्ष प्रदीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजस्तंभाचे पुजन करून ध्वजारोहन संपन्न करण्यात आले. त्यानंतर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्रीय नेते यांच्या प्रतीमेचे पुजन हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे कोषाध्यक्ष तथा श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथील अध्यक्ष प्रदीपराव देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन खोकले सर यांनी उपस्थित नागरिकांना अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली. अमरावती विभागीय शिक्षक संघाचे आमदार अँड किरणराव सरनाईक यांच्या तर्फे इयत्ता ०५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्यचे वाटप प्रदीपराव देशमुख, सरपंच अमोल भैय्या देशमुख सचिव काकडे प्राचार्य गजानन खोकले सर व प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शाळा समितीचे सदस्य बालकिशोर गिरी,नारायण बैस , माधवराव घुले,रजनीश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सौ सुजाता ताई देशमुख,वाकद ग्रामपंचायत सरपंच अमोल भैय्या देशमुख, उपसरपंच प्रयागबाई थोरात, सचिव काकडे आरोग्य अधिकारी डॉ पतंगे पत्रकार उध्वराव जटाळे,ह.भ.प.अशोक अस्तरकर महाराज, माजी पोलीस पाटील डॉ अशोकराव भोपाळे ग्रा.पं सदस्य शेख रऊफ भाई ,सै.अकिलभाई, गोपाल चोपडे, गजानन तिरके, गणेश अंभोरे,बेंडवाले ,गणेश मोरे ,माजी सरपंच बबनराव घुगे, गावातील प्रतिष्ठित नागरिक देविदास तिरके, रामदास गवळी,उत्तम अंभोरे, विश्वाराव देशमुख, माजी ग्रा.पं सदस्य शेख सिराज भाई, से. सो.चे अध्यक्ष मनोज चोपडे,व बहुसंख्य युवक,नागरीक यांची उपस्थिती होती. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ओव्हर, प्रा.सुभाष उमाळे, यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.देविदास खरात यांनी केले.
0 Response to "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा वाकद"
Post a Comment