स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर
साप्ताहिक सागर आदित्य
स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर
वाशिम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज १५ ऑगस्ट रोजी व्यापारी युवा मंडळ,मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि जिल्हा प्रशासन,वाशिम यांच्या संयुक्त वतीने एसआरसीसी कॉम्प्लेक्स, वाशिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,मोरया ब्लड ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र धोंडगे,व्यापारी युवा मंडळाचे दिलीप केशवानी आणि रेखा रावले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रक्तदान करणारे अभिषेक काष्टे, रितेश नागरे व विजय ढगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. एच.एस.मुंडे,वैज्ञानिक रक्त अधिकारी सुभाष फुके,कल्पना उलेमाले, अधिपरिचारक आशिष इंगळे परिसेवक लक्ष्मण काळे तसेच मोरया ब्लड ग्रुपचे अक्षय हजारे, योगेश लोनसुने,श्याम खोले व स्वप्नील विठोकार यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला.
0 Response to "स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर "
Post a Comment