जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑल टाइम डॉक्युमेंट मशीनचे उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑल टाइम डॉक्युमेंट मशीनचे उद्घाटन
वाशिम आज १५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या ऑल टाइम डॉक्यूमेंट मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेस हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, नितीन चव्हाण,सुहासिनी गोणेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख शिवाजी भोसले, वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार व वाशिम तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑल टाइम डॉक्युमेंट मशीनमधून ऑनलाईन सातबारा, आठ - अ तसेच जुने सातबारा, आठ - अ, कोतवाल बुकाची नक्कल व पेरेपत्रक हे जुने अभिलेख प्रत्येकी केवळ ३० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या मशीन जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कानडी येथील शेतकरी सुरेश भोयर यांना ऑनलाईन सातबारा देण्यात आला.
0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑल टाइम डॉक्युमेंट मशीनचे उद्घाटन "
Post a Comment