15 ऑगस्टला रक्तदान शिबिर जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
15 ऑगस्टला रक्तदान शिबिर
जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व्यापारी युवा मंडळ, मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्त वतीने १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजतापर्यंत छत्रपती शिवाजी चौक मार्गावरील वाशिम अर्बन बँकेच्या बाजूला असलेल्या एसआरसीसी कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी महेश धोंडगे ( ९८२२२२ ०२३५) दिलीप केसवाणी (८८८८१२ ८४४०) व श्रीमती रेखा रावले यांच्याशी संपर्क साधावा. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 Response to "15 ऑगस्टला रक्तदान शिबिर जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन "
Post a Comment