-->

मुलांना उच्च शिक्षण देवून स्वावलंबी बनवा : राजु वानखडे

मुलांना उच्च शिक्षण देवून स्वावलंबी बनवा : राजु वानखडे



साप्ताहिक सागर आदित्य 

मुलांना उच्च शिक्षण देवून स्वावलंबी बनवा : राजु वानखडे

अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांना गणवेश वाटप

वाशीम : आपल्या मुलांना नियमित शाळा, कालेजमध्ये पाठवून त्यांना उच्च शिक्षण देवून स्वावलंबी बनवावे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक राजुभाऊ वानखडे यांनी केले. ते वाशीम येथील नगर परिषद धु्रव शाळेतील अंगणवाडी केंद्र ८१ मध्ये १३ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक राजुभाऊ वानखडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजु आधारवाडे, समाजसेवक व पत्रकार निलेश सोमाणी, अनिल काठोळे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम राष्टमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या गणवेश वाटप कार्यक्रमात राजुभाऊ वानखेडे, निलेश सोमाणी व संजु आधारवाडे यांनी स्वखर्चाने नगर परिषद ध्रुव शाळेत अंगणवाडी क्रमांक ८१ ला ३० गणवेश, नंदीपेठ अंगणवाडी क्रमांक ९९ ला २५ गणवेश, भिमनगर अंगणवाडी क्रमांक ६० ला २५ गणवेश तसेच माहुरवेस अंगणवाडी क्रमांक ७५ ला १० गणवेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना राजुभाऊ वानखडे म्हणाले की, आपल्या मुलांना नियमित शाळा, कालेजमध्ये पाठवून त्यांना उच्च शिक्षण द्येवून स्वावलंबी बनवावे जेणेकरून ते विद्यार्थी पुढे चालुन मोठे अधिकारी होतील. तसेच पुढील दिवसात आपण वाशीम शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील मुलांना गणवेशाचे वाटप करू असे ते म्हणाले. प्रमुख पाहुणे निलेश सोमाणी व संजु आधारवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अंगणवाडी सेविका संगिता पानझाडे यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका नंदा गोटे यांनी मानले. अंगणवाडी सेविका विना पिंपळकर, अनिता कल्ले, मदतनीस छाया इंगोले यांची उपस्थिती होती.



                         





0 Response to "मुलांना उच्च शिक्षण देवून स्वावलंबी बनवा : राजु वानखडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article