आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याचा समारोप श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम----- पिंपळा
साप्ताहिक सागर आदित्य
आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याचा समारोप
श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम-----
पिंपळा:- हर घर झंडा, घर घर झंडा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय वाशिम व जिल्हा भारत स्काऊट व गाईड कार्यालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट पथक व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्काऊट पथक यांनी आझादी का अमृत महोत्सव निमित्त जनजागृतीपर पर पथनाट्य तयार करून परिसरातील पिंपळा, आमखेडा, हनवतखेडा व आज दि.१२/०८/२०२२ रोजी बोरगाव या गावात ग्राम पंचायत कार्यालय समोर व बौद्ध विहार परिसरात त्याचे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्याची निर्मिती विद्यालयातील स्काऊट मास्टर नितेश भिंगे सर व क्रीडा मार्गदर्शक जी.डी.कोरडे सर यांनी केली.यामध्ये विद्यालयातील दोन्हीही पथकातील स्काऊटस् नी दि.१३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तिरंगा ध्वज प्रत्येक घरी फडकवायचा असतांना घ्यावयाची काळजी व त्याची ध्वज संहिता याबाबतची जनजागृती केली. या पथनाट्यात आपल्या देशाबद्दल असलेली आपली कर्तव्य व जबाबदारी तसेच संहिता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपल्या राट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबद्दल लोकांमध्ये स्काऊट पथकांनी आपल्या बोली भाषेत व विविध राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन पथनाट्याद्वारे सादरीकरण केले.
या पथनाट्याने परिसरातील पिंपळा,आमखेडा,हनवतखेडा व बोरगाव या गावांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी केले. बोरगावचे सरपंच वसंतराव लांडकर यांनी घर घर तिरंगा हे अभियान यशस्वीपणे राबवावे असे नागरिकांना आवाहन केले.
या पथनाट्याचा समारोपीय कार्यक्रम बोरगाव जि.प.शाळेत घेण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला गावातील जि.प. शाळेचे शिक्षकवर्ग, नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.हा आझादी का अमृत महोत्सव निमित्त जनजागृतीपर पथनाट्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे योगदान लाभले.
0 Response to "आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याचा समारोप श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम----- पिंपळा"
Post a Comment