-->

चार पुरस्कारार्थीना  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

चार पुरस्कारार्थीना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

चार पुरस्कारार्थीना  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

 वाशिम  महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतात.सन 2014 - 15 ते सन 2017 - 18 या कालावधीतील चार पुरस्काराचे वितरण आज 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

      सन  2014 -15 चा पुरस्कार श्रीमती वंदना कंकाळ यांना,सन 2015 - 16 चा पुरस्कार श्रीमती लक्ष्मी माहुरे यांना, सन 2016-17 चा पुरस्कार श्रीमती संध्या सरनाईक यांना आणि सन 2017-18  चा पुरस्कार एड. श्रीमती भारती सोमाणी यांना प्रदान करण्यात आला.चारही पुरस्कारार्थीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन षण्मुगराजन  आणि श्रीमती पंत यांनी सन्मानीत केले.

        यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी,परिविक्षा अधिकारी गजानन पडघन,प्रभारी जिल्हा संरक्षण अधिकारी बंडू धनगर,संरक्षण अधिकारी भगवान ढोले,सहायक लेखाधिकारी आलिशा भगत, लेखापाल प्रांजली चिपडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी यांची उपस्थिती होती. 

       8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्ह्यातील मंगरुळपीर येथिल समाजसेविका श्रीमती वनमाला पेंढारकर यांनी तर स्वर्गीय नूरजहाँ बेगम हमीद पांडे यांच्या वतीने हमीद पांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Related Posts

0 Response to "चार पुरस्कारार्थीना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article