
ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली . ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली . ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली आहे . या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . विविध प्रक्षाचे प्राबल्य असले तरीही , ग्रामीण सोयीच्या राजकारण सुरू केले आहे . मात्र , स्थानिक नेत्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे जिल्हयातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे . त्यामुळे जिल्हयातील नेत्यांनी सावध भूमिका घेतल्या आहेत . आपल्या सर्वच कार्यर्त्यांच्या भूमिकांना ते पडद्याआडून आशीर्वाद देत आहेत . थेट राजकारणला वेग आला आहे . यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हयातील राजकारणातील मित्र हा शत्रू तर , शत्रू हा मित्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . या निमित्ताने राजकीय वातावरण तापत आहे . विविध पक्षांशी संबंधीत गावपातळीवरील कार्यकर्ते पक्षाची झुल बाजुला ठेवताना दिसत आहेत . ग्रामपंचायतीच्या निवडणुका निमित्ताने स्थानिक नेते सोयीचे राजकारण करताना दिसत आहेत . यामुळे निवडणुकीत कालचे मित्र शत्रू झाले आहेत . तर , शत्रू मित्र झाले आहेत . यामुळे कार्यकर्त्यांची मोठी गोची झाल्याचे दिसत आहे . पारंपरिक स्थानिक गटातच लढतीचे संकेत मिळत आहेत . राजकीयदृष्ट्या काही संवेदनशील गावात पारंपरिक गटांना गटाचे आव्हान असणार आहे . यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते . परिणामी , जिल्हयातील निवडणुकीत चूरस मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षाची झुल बाजुला ठेवत सोयीप्रमाणे उमेदवार शोधत आहेत
0 Response to "ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली . ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली"
Post a Comment