
मृदा व जलसंधारण विभागाची गाळ काढण्याची ९ कामे सुरू
साप्ताहिक सागर आदित्य
मृदा व जलसंधारण विभागाची गाळ काढण्याची ९ कामे सुरू
१४ कामातून १ लक्ष ४१ हजार घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन
वाशिम गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत मृदा व जलसंधारण विभागाची जिल्ह्यात ९ कामे सुरू असून या तलावातून आतापर्यंत २१ हजार ७२५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. एकूण १४ कामातून १ लक्ष ४१ हजार ७०० घनमीटर गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे.
वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील साठवण तलावातून गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.या तलावातून ७५०० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे.वाशिम तालुक्यातील खंडाळा येथील सिंचन तलावातून ५००० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला.रिसोड तालुक्यातील वाघी येथील सिंचन तलावातून ३६०० घन मीटर गाळ लोकांच्या सहभागातून काढण्यात आला.जवळा येथील सिंचन तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.या तलावातून ५०० घनमीटर गाळ काढण्यात आला. मालेगाव तालुक्यातील कुराळा येथील सिंचन तलावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे.या तलावातून आतापर्यंत ५०० घनमीटर,कारंजा तालुक्यातील सुकळी येथील सिंचन तलावातून आतापर्यंत २७०० घनमीटर,मानोरा तालुक्यातील वाई(गौळ) येथील सिंचन तलावातून ६७५ घनमीटर,पंचाळा येथील सिंचन तलावातून ५०० घनमीटर आणि धानोरा(भुसे) येथील सिंचन तलावातून ७५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. ही कामे लोकसभागातून करण्यात आली आहे.
वाशिम तालुक्यातील कळंबा (महाली) येथील सिंचन तलावातून २२ हजार घनमीटर, रिसोड तालुक्यातील मांडवा येथील सिंचन तलावातून १७ हजार घनमीटर,पाचंबा येथील सिंचन तलावातून १५ हजार घनमीटर, गौडाळा येथील सिंचन तलावातून २० हजार घनमीटर आणि कोयाळी (जाधव) येथील सिंचन तलावातून २२ हजार ५०० घनमीटर गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे.मृदा व जलसंधारण विभागाच्या १४ तलावातून एकूण १ लक्ष ४१ हजार ७०० घनमीटर गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे.
0 Response to "मृदा व जलसंधारण विभागाची गाळ काढण्याची ९ कामे सुरू"
Post a Comment