
जातिक शौचालयदिनी ग्राम पंचायतमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. जिल्हा स्तराहुन अधिकारी देणार आकस्मात भेटी...
साप्ताहिक सागर आदित्य
जातिक शौचालयदिनी ग्राम पंचायतमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन.
जिल्हा स्तराहुन अधिकारी देणार आकस्मात भेटी...
वाशिम: दि18
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सर्व ग्राम पंचायतीतध्ये स्वच्छतेबाबत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी दिले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी- कर्मचारी तसेच तालुकास्तरीय विस्तार अधिकारी, गट समन्वयक यांनी शनिवारी विविध ग्रामपंचायतींना भेटी देऊन याबाबतचा अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश कोवे यांनी गट विकास अधिकारी यांच्या बैठकीत (दि 18) दिले.
दरवर्षी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन भारतभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये दि. 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान गावाच्या स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी यापूर्वीच दिले आहेत.
बैठकीत गट विकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागे राहिलेल्या कामांसंदर्भात चर्चा केली. सन 2021-22 या आर्थिक वर्षातील प्रलंबित असलेले एकुण सुमारे 1461 लाभार्थ्यांचे प्रस्ताव तपासुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी दिले. पीएफएमएस प्रणालीमुळे अनुदान वितरण प्रणालीमध्ये काय अडचणी येतात हे तपासण्यासाठी वाशिम पंचायत समितीमध्ये सहायक लेखाधिकारी यांच्यासोबत बसुन किमान 10 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वळती करण्याचे निर्देश कोवे यांनी जिल्हा कक्षाचे लेखाधिकारी प्रविण पान्हेरकर यांना दिले. यानंतर इतर पंचायत समितीमध्येसुध्दा यापध्दतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ज्या शौचालयाला एकच शोष खड्डा असेल अशा शौचालयाकरीता दुसरा खड्डा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश कोवे यांनी दिले. फ्लॅगशिप कार्यक्रम राबविण्यासाठी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी यांना समप्रमाणात गावाची जबाबदारी देण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. ओडिएफ प्लस ग्राम पंचायतीसाठी सर्व ग्रामपंचायतींकडे घंटागाडी असणे आवश्यक असल्यामुळे त्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सुचना प्रकल्प संचालक कोवे यांनी दिल्या. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांची उपस्थिती होती.
जागतिक शौचालय दिनानिमित्त गुड मॉर्निंग पथक धडकणार:
जिल्ह्यात 19 नोव्हेंबर पासुन जिल्ह्यात पासुन गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे. दररोज विविध तालुक्यातील गावांमध्ये उघड्यावर जाणाऱ्यांना समज देण्यात येत आहे तसेच त्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. दिनांक 19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्राम स्वच्छता निगरानी समितीच्या माध्यमातुन सर्व गावामध्ये गुड मॉर्निंग पथक राबवुन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना परावृत्त करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी सुध्दा जास्तीत जास्त गावात जाऊन गुड मॉर्निग मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी दिली.
0 Response to "जातिक शौचालयदिनी ग्राम पंचायतमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. जिल्हा स्तराहुन अधिकारी देणार आकस्मात भेटी..."
Post a Comment