जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम येथे २ ऑक्टोंबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम येथे २ ऑक्टोंबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला :डॉ.प्रभानकर
वाशिम ; जिल्हा सामान्य रुग्णालय सेवा केंद्र विभाग येथे 2 ऑक्टोंबर 2024 रोजी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला हस्ते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्रभानकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी समाधान लोणसूने यांनी पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिमेला अभिवादन.
२ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करतो. या दिवशी भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि नेते महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हा दिवस राष्ट्रीय सण आहे. महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांच्या बलिदान आणि योगदानासाठी त्यांना 'राष्ट्रपिता' हा दर्जा देण्यात आला आहे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. गांधीजींमध्ये लोकांचे नेतृत्व करण्याची अप्रतिम क्षमता होती. त्यांचे विचार दोन पिढ्यांना प्रेरणा देणारे होते. लोक त्यांच् विचारांच्या प्रभावाखाली आले आणि स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले. स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देण्याचे कामही त्यांनी केले. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वापुढे सारे जग झुकले. त्यामुळे आज २ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला मनोगत डॉ. प्रभानकर यांनी व्यक्त केले.
या वेळी उपस्थित अधिकारी डॉ.प्रभानकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी समाधान लोणसूने, जिल्हा प्रकल्प समन्वयक दिगंबर महाजन,क्षेत्रकार्य अधिकारी सुरेंद्र खंडेराव, प्रदिप पट्टेबहदुर यांची उपस्थिती होती.
0 Response to "जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम येथे २ ऑक्टोंबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी"
Post a Comment