-->

तुमच्या शाळेची स्वच्छता खूपच आवडली.....

तुमच्या शाळेची स्वच्छता खूपच आवडली.....



साप्ताहिक सागर आदित्य 

तुमच्या शाळेची स्वच्छता खूपच आवडली.....


मालेगांव पंचायत समितीचे  मधुकर मामा काळे यांनी नुकतीच घाटा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे अचानक भेट दिली.सर्व शिक्षक वर्गात अध्यापनात गर्क असतांना संपूर्ण परिसर पाहणी स्वतः एकट्यानेच केली.तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हती.नंतर मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर सर यांनी त्यांना परसबाग,वर्ग खोल्या,शाळेची सुरू असलेली रंगरंगोटी दाखविली.नंतर वर्ग 3 रा व वर्ग 4 था मधील विद्यार्थ्यांना मराठी वाचन करण्यास सांगितले.न अडखळता योग्य उच्चारसह केलेले वाचन पाहून आनंदित झाले..*हीच आपली खरी कमाई असल्याचे उदगार त्यांनी काढले*.नंतर त्यांनी वर्ग 1 ला व वर्ग 2 रा वर्गात प्रवेश केला.वर्गातील संख्या व उपस्थिती पाहून ही आपल्या चांगल्या शिकविण्याची पावती असल्याचे द्योतक आहे असे ते म्हणाले.लहानशा गावातून इयत्ता 1 ली मध्ये 20 विद्यार्थी दाखल झाले ही एक मोठी उपलब्धता आहे.

नंतर त्यांचा सर्व शिक्षकवृंदांनी सत्कार केला. 

*अहो मी तुमचा मामा आहे...भाच्याच्या भेटीला आलो.... सत्काराची काही गरज नव्हती..शाळा पाहणे हा काही उद्देश नाही..तुम्ही सर्वजण हसत बोलत आहात यातच मला आनंद आहे...* असे उद्गार त्यांनी काढले. दोन खोल्या कमी असल्याचे सरपंच प्रकाश पाटील यांनी सांगताच चक्रधर भाऊ कडे जाऊन ही समस्या लगेच सोडवू असे सांगितले.अतिशय विनम्रपणे सर्वांना राम राम करत करत निरोप घेतला.यावेळी सरपंच प्रकाश पाटील,मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर,रतन पट्टेबहादुर,संमती पांचवाटकर,कु.दिपाली कापसे मॅडम,विठ्ठल कालवे ,प्रशिक्षणार्थी विठ्ठल सोमटकर उपस्थित होते.

0 Response to "तुमच्या शाळेची स्वच्छता खूपच आवडली....."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article