कैलास खासभागे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
कैलास खासभागे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मुंगळा गावचे सुपुत्र कैलास प्रभाकर खासभागे यांची यंदाच्या आदर्श शिक्षकरत्न पुरस्कारासाठी कै. माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन ,कोल्हापूरतर्फे निवड करण्यात आली होती.राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट (शाहू स्मारक) कोल्हापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
हिर्डेकर म्हणाले,"नव्या युगास सामोरे जाणा-या शिक्षकांसाठी येणारा काळ निश्चितच आव्हानात्मक असून काळ कितीही पुढे गेला तरी सरांची सर मात्र कधीच येणार नाही".फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.अजित सुर्यवंशी यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले.
दरम्यान राज्यातील शिक्षण,आरोग्य ,शेती, व्यापार ,संगीत, कला व अध्यात्मिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, "विविध क्षेत्रात आपापल्या पेशाला न्याय देत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील गुणवंतांचा यथोचित सन्मान करुन कै. माणिकराव पाटील एज्युकेशनल फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे".
कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षक नेते रवी पाटील,प्रमोद तौंदकर,गौतम वर्धन ,सुरेश कांबळे ,शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,कै. माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुनिता पाटील, मार्गदर्शक तुषार पाटील,सचीव धनश्री पाटील ,राजेंद्र पाटील ,आनंदा यादव, पांडुरंग पाटील, फाउंडेशनचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.स्वाती पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी एस. के. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Response to "कैलास खासभागे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान"
Post a Comment