दी आर्य शिक्षण संस्थे अंतर्गत शाळा,कॉलेजचे अंशतः विनाअनुदानित कर्मचारी हुंकार आंदोलनासाठीआझाद मैदान मुंबई येथे रवाना.
साप्ताहिक सागर आदित्य
दी आर्य शिक्षण संस्थे अंतर्गत शाळा,कॉलेजचे अंशतः विनाअनुदानित कर्मचारी हुंकार आंदोलनासाठीआझाद मैदान मुंबई येथे रवाना....* दिनांक 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी रिसोड तालुक्यातील नामांकित दी आर्य शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक व शाळा रिसोड, भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड ,भारत प्राथमिक शाळा रिसोड, भारत माध्यमिक विद्यालय चिंचाबा पेन व भारत माध्यमिक विद्यालय चिंचाबा भर,या सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मुंबई येथे आझाद मैदानावर मागील 43 दिवसापासून सुरू असलेल्या हुंकार आंदोलनासाठी रवाना झाले असता. मागील कित्येक वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले यामध्ये असंख्य कर्मचारी आहेत काही कर्मचारी 20%, टक्के 40 टक्के 60% टक्के असे तुटपुंजे मानधनावर काम करतात. अशा अल्पशा पगारावर कित्येक वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र अशी काम करत असताना. स्वतःचा संसार चालवणे अवघड झाले आहे. म्हणून शासन दरबारी टप्पा वाढीसाठी तसेच प्रचलितुसार अनुदान द्यावे म्हणून आंदोलनासाठी आझाद मैदानावर हुंकार आंदोलनाला 40 कर्मचारी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून अनेक कर्मचारी मुसळधार पाऊस असताना सुद्धा आझाद मैदान मुंबई मध्ये आले आहेत. महाराष्ट्र मध्ये एकूण 63 हजार कर्मचारी अंशतः अनुदानित अशा तुटकुंजा मानधनावर काम करत आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांची शासनाला एकच मागणी आहे की लवकरात लवकर प्रचलितुसार अनुदान द्यावे किंवा टप्पा वाढ द्यावी. अशी आर्त किंकाळी आपला आंदोलनातून करत आहे. काही शिक्षक कायम विना अनुदानावर सेवेत रुजू झाले आणि विनाअनुदानित वर सेवा निवृत्त झाले. काही शिक्षक तर 20% टक्के 40% टक्के वरच सेवानिवृत्त झाले. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे कित्येकाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. तरी शासनाला या हुंकार आक्रोश आंदोलनातून एकच मागणी आहे लवकरात लवकर अनुदान द्यावे व शिक्षकाचा वनवास संपवावा...
0 Response to "दी आर्य शिक्षण संस्थे अंतर्गत शाळा,कॉलेजचे अंशतः विनाअनुदानित कर्मचारी हुंकार आंदोलनासाठीआझाद मैदान मुंबई येथे रवाना."
Post a Comment