-->

जाधव महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन..

जाधव महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन..



साप्ताहिक सागर आदित्य 

जाधव महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन..


स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छताही सेवा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त विविध स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये महाविद्यालयाची  स्वच्छता व स्वच्छता विषयक शपथ, स्वच्छता जनजागृतीपर  पथनाट्य, रॅली, मार्गदर्शन यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक कार्यरत असून या पथकाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविले जातात, त्याचप्रमाणे शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वच्छतेचे महत्व लक्षात घेता स्वच्छता विषयक जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने स्वच्छता अभियान, प्लास्टिक कचरा निर्मूलन, गाजर गवत निर्मुलन, वृक्षारोपण इ. विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या रासेयो  विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . 

सदर उपक्रमासाठी श्री व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष ॲड विजयराव जाधव महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पद्मानंद तायडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. सदर उपक्रमासाठी प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

0 Response to "जाधव महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन.."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article