-->

वस्त्राचा त्याग करून तीन ब्रह्मचारी यांनी घातली  जैनेश्वरी दीक्षा.

वस्त्राचा त्याग करून तीन ब्रह्मचारी यांनी घातली जैनेश्वरी दीक्षा.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वस्त्राचा त्याग करून तीन ब्रह्मचारी यांनी घातली  जैनेश्वरी दीक्षा.

संन्मती नगर फाफडी रायपूर छत्तीसगड येथे तीन बालब्रह्मचारी यांनी दिगंबर रूप धारण करून जैनेश्वरी मुनि दीक्षा घेतली. रायपूर येथे 23 वर्षानंतर दिगंबर जैन समाजात मुनिदीक्षेचा सोहळा संपन्न झाला .तिनही ब्रह्मचारी यांनी आपल्या शरीरावरील केस ,पगडी ,वस्त्र आदी संसारिक सुखाचा त्याग करीत आचार्य विशुद्ध सागर जी महाराज यांच्याशी जैनेश्वरी मुनि दीक्षा घेतली .मुनिदीक्षेच्या पूर्वी तिन्ही बालब्रह्मचारी दीक्षार्थी यांची इच्छा जाणून घेतली .तसेच आई-वडील ,धर्माचे आई-वडील, समाज ,उपस्थित 22 मुनी महाराज यांना विचारून मुनि दीक्षा देणे प्रारंभ केले .यावेळी आचार्य  जी ने दीक्षार्थींना नियमानुसार पूजा ,केशलोचन, वस्त्र ,आभूषण यांचा त्याग देत मुनिदीक्षा प्रदान प्रदान केली.दीक्षा दिल्यानंतर ही आचार्य म्हणाले ,आताही काही बिघडलं नाही ,तुम्हाला वाटत असेल तर परत कपडे घालू शकता .परंतु ब्रह्मचारी दीक्षार्थी म्हणाले आम्हाला कपडे स्वीकार नाही, कपडे सोडले म्हणजे सोडले! आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत .यानंतर तिन्ही ब्रह्मचारी यांना महाराष्ट्राचे सौरभ भैय्या श्रवणमुनी  जयेंद्र सागर महाराज, छतरपुर चे निखिल यांना  जितेंद्र सागर महाराज ,आणि भिंड येथील विशाल यांना  जयंत सागर महाराज नाव देण्यात आले. तीनही ब्रह्मचारी यांनी दीक्षा पुर्वी सर्वांची माफी मागितली .दिगंबर दीक्षा देण्यापूर्वी ब्रह्मचारीचे आई-वडील, धर्माचे आई-वडील यांनी आचार्य जीना दीक्षा देण्याची विनंती केली .आणि म्हणाले तुमच्या सारखेच मुनि होण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर तिन्ही दीक्षाार्थी यांनी उपस्थित सर्व समाज ,गुरुवर्य, आई वडील यांची माफी मागितली .आणि म्हणाले आजपासून फक्त गुरु महाराज यांच्या सोबतच राहून देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. दीक्षा कार्यक्रमात राष्ट्रसंत ललित प्रभू महाराज उपस्थित होते. त्यांनीही आशीर्वाद प्रदान केले. यावेळी ललित प्रभु महाराज म्हणाले पुढील चातुर्मास शेतांबर दिगंबर समाजाचा चतुर्मास एकाच ठिकाणी ,एकाच पेंडाल मध्ये व्हावा  यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. छत्तीसगडची राजधानी येथे प्रथमच 22 मुनि महाराजांच्या उपस्थिती भव्य ज्ञानेश्वरी दीक्षा  समारोहात मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र ,उडीसा येथून हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. 

         वाशिमचे प्रवीण नीना पाटणी यांना धर्माचे आई-वडील होण्याचा बहुमान.

         परतवाडा येथील ब्रह्मचारी सौरभ भैय्या यांचे मुनि दीक्षा कार्यक्रमात वाशिमचे प्रवीण नीना पाटणी यांना धर्माचे आई-वडील होण्याचे भाग्य प्राप्त झाले .आचार्य विशुध्द सागर जी महाराज यांच्या आशीर्वादामुळेच हे भाग्य प्राप्त झाल्याचे प्रवीण पाटणी म्हणाले .जैन समाजात या जेनैश्वरी  दीक्षा घेणाऱ्या ब्रह्मचारी भैय्याचे आई-वडील होणे याला अतिशय भाग्याचे समजले जाते. ब्रह्मचारी सौरभ भैय्या यांनी 24 जुलै 2019 रोजी सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी येथे आजीवन ब्रह्मचर्यवताचा संकल्प केला होता. जैनेश्वरी मुनि दीक्षा कार्यक्रमात माजी मंत्री  ब्रजमोहन अग्रवाल, पूर्व मंत्री राजेश मुन्नत, राकेश बाकलीवाल ,नरेंद्र काला, कमल पटवा ,निखिल काला, प्रतिभा पान्डे,अशोक पहाडे, राकेश बाकलीवाल,आकाश पाटणी, प्रदीप गंगवाल,सतिश छाबडा आदी मान्यवर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "वस्त्राचा त्याग करून तीन ब्रह्मचारी यांनी घातली जैनेश्वरी दीक्षा."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article