
गोवरची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा डाॅ नवघरे
गोवरची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा डाॅ नवघरे
सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गोवर या व्याधी ने डोकं वर काढलं आहे.. अनेक व्यक्ती या आजाराला बळी पडत आहे.
गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी,हा आजार पूर्णत बरा होणारा आजार आहे.
या आजारात प्रामुख्याने ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडचे आतील बाजूस पांढरा वर्णाचे चट्टे दिसणे. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात व हा व्याधी पूर्णपणे बरा करता येतो
गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते.
गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ.विजय विष्णू नवघरे
संजीवनी बाल रुग्णालय मालेगाव
8668347245
0 Response to "गोवरची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा डाॅ नवघरे"
Post a Comment