
जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याबद्दल मार्गदर्शन
साप्ताहिक सागर आदित्य
जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याबद्दल मार्गदर्शन
नागरतास :- चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे शेतकऱ्यांना सांगितले फायदे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अंतर्गत गीताई ह्यूमन काईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय आमखेडा च्या कृषिकन्या कु. प्रियंका गजानन पाटील आणि कु. साक्षी राजेंद्र वैराळकर या विद्यार्थिनींनी नागरतास इथल्या शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याकरता मार्गदर्शन केले.
यामध्ये विद्यार्थिनींनी चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उन्हाळ्यात वाढलेल्या चाऱ्यामधून जनावरांना हवी तेवढी ऊर्जा मिळू शकत नाही त्यामुळे जनावरांच्या शरीरावर ताण येतो अशावेळी जनावरांच्या चाऱ्यावर गुळ आणि मिठाची प्रक्रिया केल्यास जनावरांना तत्काळ ऊर्जा मिळते, चाऱ्याची चव वाढते. जनावरांच्या खाण्याचे प्रमाण वाढून चाऱ्याचा अपव्यय टाळला जातो. पचनइयत्ता वाढते, कमी चाऱ्यात जनावरांचे पोषण करता येते. शेतकऱ्यांना चाऱ्यावर गुळ आणि मिठाची प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करताना 100 किलो चाऱ्यासाठी एक किलो गुळ आणि एक किलो मीठ 20 ते 25 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण 100 किलो चाऱ्यावर समप्रमाणात शिंपडावे. हा चारा 12 ते 24 तास झाकून ठेवून नंतर जनावराच्या आहारात वापरावा. या प्रक्रियेमुळे चारा माऊ होतो. चव वाढल्यामुळे जनावरे असा चारा आवडीने खातात, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. जाधव, प्रा.प्रदिप निचळ, प्रा. आर.एस. करंगामी, प्रा. अंकुश वाठोरे व इतर प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
0 Response to "जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याबद्दल मार्गदर्शन"
Post a Comment