वाशिम येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
वाशिम, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय वाशिम सभागृहात रानभाजी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणात येणाऱ्या विषमुक्त पौष्टिक रानभाज्याचा आपल्या आहारात समावेश होऊन आरोग्य निरोगी राहावे याकरिता तसेच रानभाज्या उत्पादकांना व विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच रानभाज्याच्या पौष्टिक व आरोग्यदायी गुणधर्मांचा परिचय व्हावा याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय नवीन सभागृह वाशिम येथे आयोजित केला आहे तरी वाशिम शहर परिसरातील नागरिकांनी तसेच ग्रामीण भागातील रानभाज्या उत्पादकांनी सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0 Response to "वाशिम येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन"
Post a Comment