वाशिम जिल्ह्यातील 25 टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव सोहळा
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यातील 25 टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव सोहळा
टीबी मुक्त पंचायत गौरव सोहळा 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे , यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन भवन वाशिम येथे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश परभणकर व सर्व मान्यवरांच्या यांच्या हस्ते महात्मा गांधीजीच्या प्रतीमेस आणि रॉबर्ट कॉकच्या प्रतीमेस पुष्प वंदन करून शुभारंभ करण्यात आला.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. काळे , डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ.नांदेकर, सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी सर्व, वैद्यकीय अधिकारी सर्व, समुदाय आरोग्य अधिकारी सर्व, आरोग्य सेवक सर्व, आरोग्य सेविका सर्व, एनटीईपी स्टाफ सर्व, आशा सर्व संबंधित ग्रामपंचायत हे कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.
सन 2023 (जानेवारी ते डिसेंबर २०२३) मध्ये टीबी मुक्त पंचायत अभियाना मध्ये कारंजा 1, वाशिम 8, मालेगाव 9, मानोरा 1, मंगरूळपीर 3, रिसोड 3 अशा एकूण 25 ग्राम ग्रामपंचायतीचा महात्मा गांधीजींचा पुतळा व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 25 ग्रामपंचायत टिबी मुक्त होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, एसटीएस, एस टी एल एस, टीबीएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ते व गावातील लोकप्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे सर मार्गदर्शन करताना म्हणाले की मागील पाच महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे काम चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील वर्षात सुद्धा याच ग्रामपंचायत टीबी मुक्त होऊन शिल्वर पारितोषिक मिळवण्याकरिता चांगल्या प्रकारे काम करून मा. सरपंच यांनी सहकार्य करावे व गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, राज्य व देश टीबी मुक्त करूया असे म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंच यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंचांना निक्षय मित्र म्हणून उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. तसेच डॉ. अनिल कावरखे यांनी विजेत्या ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले व कामामध्ये सतत्त्या ठेऊन टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यास मदत करावी.
सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजय काळे यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन लोणसूने, जिल्हा कार्यक्रम समन्वयक व सोनुने,जिल्हा पीपीएम कॉर्डिनेटर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकामध्ये अग्रेसर आहे यासाठी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय एनटीईपी कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहीत केले.
0 Response to "वाशिम जिल्ह्यातील 25 टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव सोहळा"
Post a Comment